चुकीची व अफवा पसरविणारी पोस्ट व्हायरल करू नये- जिल्हाधिकारी


जळगाव –
सहकार्य न केल्यास जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे जिल्हाधिकारी यांचे संकेत या शीर्षका खाली सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेली पोस्ट चुकीची आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा लागू असून अशावेळी चुकीची व अफवा पसरविणारी माहिती व्हायरल करून
नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे चुकीचे आहे. जे कोणी अशी चुकीची माहिती व्हायरल करून अफवा पसरवतील अशा व्यक्ती विरोधात सायबर कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. असा इशाराही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *