भुसावळ (प्रतिनिधी )-
सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज दि.१५ जुलै रोजी जाहीर झाला असून त्यात भुसावळ येथील सेंट्रल रेल्वे हायस्कूलच्या विद्यार्थ्यानींनी घवघवीत यश संपादन केले आहे. यात प्रथम क्रमांक पलक कुमारी ९५.८ टक्के,द्वितीय क्रमांक सानिया शाजी जोसेफ ९४.६ टक्के आणि तृतीय क्रमांक आर्या गुप्ता हिने ९४.४ टक्के गुण पटकाविले. सानिया शाजी जोसेफ या विद्यार्थिनीला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशा बद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज कुमार सिन्हा,वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन. डी.गांगुर्डे यांनी रेल्वे हायस्कूलचे प्राचार्य सतीश कुळकर्णी व सर्व शिक्षकवृंद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.



