बिहार जाणा-या प्रवाशांनी पुढील प्रवासाची काळजी घ्‍यावी


भुसावळ (प्रतिनिधी ) –
बिहार सरकारमातर्फे उद्‍या दि.१६ ते ३१ जुलै पर्यंत राज्यव्यापी लॉकडाऊन करण्‍यात आले आहे .
केंद्र सरकारतर्फे विशेष रेल्वे सेवा सुरू असून ती बंद करण्‍यात येणार नाही. कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी काही अपवाद वगळता बिहारमध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या इतर माध्यमांना सुध्‍दा प्रतिबंधित करण्‍यात आले आहे.
या तांत्रिक अडचणींमुळे बिहारमधील गंतव्यस्थानकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी वाहन विना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून बिहारच्या रेल्वे स्थानकापासून गंतव्यस्थानाकडे जाण्यासाठी आपल्‍या वाहनाची व्यवस्था आधीपासून करून ठेवावी असे आवाहन भुसावळ रेल्‍वे वाणिज्‍य विभागाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *