भुसावळ : गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने बुधवार १५ जुलै रोजी सकाळी 10 वाजता धरणाचे 14 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे.
धरणात पाण्याची पातळी 209.380 मीटर असून एकूण साठा 177.66 एम एम क्यूब आहे तर धरणातून 11373 क्युसेस व 322 क्युमेक्स वेगाने 14 दरवाजे अर्धा मिटरने उघडले असून दरवाज्यातुन पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.

दरम्यान, आज सकापासूनच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.


