अनलॉक मध्ये सोशल डिस्टनसिंगचा फज्ज़ा ; बाजारात गर्दि ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोना बाधीत रुग्न संख्येत जिल्ह्यात सातत्याने वाढ होत असल्याने अमळनेर जळगाव व भुसावळ येथे ७ ते १३ जुलै २०२० दरम्यान कडक लॉक डाऊन करण्यात आले होते.
७ ते १३जुलै लॉक डाऊन होते
मंगळवार १४ पासून पुन्हा गर्दी , वाहने, सोशल डिस्टनसिंग , मास्क आदीं बाबी सह सशर्त अनलॉक करण्यात आले आहे . किमान एका आठवडा घरात बंद झालेले नागरिक व व्यापार्यानी व दुकानदारानी एक आठवड्यानंतर पुन्हा
बाजारात खरेदी विक्री करीता एकच गर्दी केल्याचे चित्र आज सर्वत्र दिसून आली आहे . यामुळे भुसावळकराना पुन्हा लॉकडाउनला सामोरे जावे लागते की क़ाय असा प्रश्न निर्माण होत आहे .
कोरोना बाधीत रुग्नांची संख्या आटोक्यात नाही .लॉक डाऊन मध्ये त्रस्त झालेल्या मजूरांसह सर्वसामान्य नागरिकांना काम नव्हते परंतु
अनलॉक मुळे हातमजूर व गरजु यांच्या हाताला काम मिळाले मात्र अजूनही कोरोनाची भीती संपलेली नाही .
भुसावळ कोरोना संक्रमण आटोक्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी १४ जुलै पासून अनलॉक होण्याची घोषणा केली असली तरी ठरलेल्या नियमाचे पालन न केल्यास सक्त कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी  राऊत यांनी दिला आहे.
पालिका हद्दीतील आठवडे बाजार कपडा मार्केट, सराफ बाजार ,मॉर्डन रोड आदी गर्दीच्या भागात ‘ नो व्हेईकल’ झोन घोषित करण्यात आले आहे. या भागात सर्वच वाहन बंदी करण्यात आली असली तरी फक्त माल वाहतूक करणारी वाहनांना सवलत देण्यात  आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवा व शासकीय कर्मचारी यांना ये जा करणे व वाहनास परवनगी देण्यात आली आहे. या सोबतच भुसावळ पालिकेच्या मुख्यधिकाऱ्यानी कार्यक्षेत्रातील प्रभाग विभागातील तेथील परिस्थीचा विचार लक्षात घेऊन सोईप्रमाणे विभाजन करावे. आठवड्यातून जनतेने दोन दिवस तरी जनता कर्फ्यू ठेवण्यास नियोजन करून २० जुलै पर्यंत अनलॉक ठेवण्यात येणार आहे’ याव्यतिरिक्त भाजीपाला विक्री साठी ज्या जागा देण्यात आल्या आहे त्यांनी तेथेच फळ व भाजीपाला विक्री करावी. मात्र एक आठवड्याच्या कडक लॉक डाऊन नंतर आज पहिल्याच दिवशी शहरातील व बाजारातील अनेक दुकानदारांनी दुकाने उघडल्याचे दिसून आले .
नागरिकांमध्ये अजूनही जनजागृतीची अत्यंत गरज असून पोलिस व प्रशासनाने कठोर पाउल उचलावीत अशी सुज्ञ नागरिकांची मागणी आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *