डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई ; 1 लाखाचे वर दंड वसूल ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
तालुक्यातील वरणगाव जवळील भोगावती नदी पात्रातून ट्रॅक्टरने डबरची चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर तहसील कार्यालयाने दिनांक १३ जुलै रोजी कारवाई केली असून १ लाख ६ हजार ७२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे . भुसावळ तालुक्यातील वरणगाव जवळील भोगावती नदीपात्रातून ट्रॅक्टरने चोरटी डबरची चोरटी वाहतूक केली जात असल्याची माहिती वरणगाव मंडळ अधिकारी योगिता पाटील व तलाठी के आर.ठाकूर यांना मिळाली.

यानुसार त्वरीत ते घटनास्थळी गेले असता या ठिकाणी
ट्रॅक्टर एम एच.१९ ए. एन.२१८१ मध्ये डबर भरून वाहतूक करतांना मिळून आले.
सदर ट्रॅक्टर मालक यशवंत महाजन राहणार फुलगाव यांचे असून या प्रकरणी १ लाख ६ हजार ७२० रुपयांचा दंड आकारण्यात आला असून ट्रॅक्टर तहसील आवारात लावण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *