भुसावळ प्रभाग क्र.९ मध्‍ये अमृत योजनेच्‍या कामाला सुरुवात ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी भाजपने दिलेल्‍या आश्‍वासनाच्‍या पुर्ततेच्‍या कामाला सुरूवातीची महत्‍वाकांक्षी योजना अमृतची नगरपरिषदेतर्फे पाईप लाईन टाकण्‍याच्‍या कामास सोमवार दि.१३ जुलै रोजी प्रभाग क्र.९ मधील वाल्‍मिक नगर भागात सुरूवात करण्‍यात आली.
प्रभागाच्‍या नगरसेविका सोनी संतोष बारसे,मा.नगरसेवक संतोष मोहन बारसे यांनीही निवडणुकीत पाण्‍याची समस्‍या सोडविण्‍याचे आश्‍वासन नागरिकांना दिले होते ते आश्‍वासन पुर्ण होत आहे.अमृत योजना पाइपलाइनचे प्रभाग क्र.९ मध्‍ये खोदकाम सुरू झाला असून पाइपलाइन टाकण्‍यात येईल.तसेच स्‍वतंत्र पाण्‍याची टाकी बनवण्‍यात येत आहे.या प्रभागात गेल्‍या अनेक वर्षांपासुन पाण्‍याची समस्‍या होती.सफाई कामगारांना सफाई कामानंतर आंघोळीसाठी पाणी गरजेचे असते मात्र आंघोळ तर सोडाच प्‍यायच्‍या पाण्‍याचीही अडचण होती.
पिण्‍यासाठी नाईलाजाने बोरींगच्‍या पाण्‍याचा वापर करावा लागत होता.लवकरच अमृत योजनेचे काम पुर्ण होऊन या प्रभागात पाण्‍याचा मोठा दिलासा मिळणार असल्‍याचे मा.नगरसेवक संतोष बारसे,नगरसेविका सोनी संतोष बारसे या दांम्‍पत्‍याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *