भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरात पु.ओ.नाहाटा महाविद्यालयासमोरील मोकळ्या जागेवर झोपड़ी (तंबू ) मध्ये राहणार्या चितोडिया यांच्या दिड लाखांच्या दागिण्यांची चोरी झाल्याची घटना गुरुवारी उघडकिस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जडीबुटी विकण्याचा व्यवसाय करणारे रामसिंग गोपाळ सिंग चितोडीया हे येथील नाहाटा महाविद्यालया समोरील मोकळ्या जागेवर झोपड़ी (तंबू ) टाकून राहतात . चितोडिया यांनी झोपडीवजा घरातील पेटीत एक लाख ५२ हजार ५०० रुपये सोन्याचे दागिने आणि पाच हजार रुपये रोख ठेवले होते चितोडीया हे झोपलेले असतांना अज्ञात चोरट्यांनी पेटीत ठेवलेले सुमारे दीड लाखांचे दागिने व रोख पाच हजार रुपये लांबवले.
या प्रकरणी शुक्रवारी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी यांच्यासह पोलिस कर्मचार्यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.



