भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे तिकीटांचे आरक्षण करण्यासाठी व तिकीट रद्द करण्याकरिता दि.१३ जुलै सोमवार पासून भुसावळ विभागातील ९ गावांमध्ये आरक्षण कार्यालय सुरू होणार असल्याची माहिती भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे देण्यात आली आहे.
यात निफाड,लासलगांव,बोदवड, नांदुरा,खामगांव,मुर्तिजापुर,
कारंजा,रावेर व जामनेर या गावांचा समावेश असून आरक्षण कार्यालय सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजे पर्यंत एका पाळीत खिडकी सुरू करण्यात येणार आहे.
आरक्षण तिकीटे काढण्यासाठी आरक्षण कार्यालयात येतांना मास्क लावून येणे आवश्यक असून सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन सुध्दा रेल्वे प्रशासनाने केले आहे.



