जळगाव –
जळगाव जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 5962 वर
जळगाव जिल्ह्यात रविवारी पुन्हा 238 कोरोनाबाधीत आढळले असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील बाधीतांची संख्या तब्बल 5962 वर पोहोचली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 83,जळगाव ग्रामीण 07,भुसावळ 06,वरणगांव 1,अमळनेर 06,चोपडा 32,पाचोरा 0,भडगाव 08,धरणगाव 15,यावल 10,एरंडोल 04,जामनेर 12,रावेर 13,पारोळा 02,चाळीसगाव 09,मुक्ताईनगर 31,बोदवड 0. अन्य जिल्हा 0
भुसावळतील आज पर्यंतचे एकुण पाँझिटिव्ह रूग्ण संख्या 539 असून आतापर्यंत कोरोना मुक्त 367 झाले तर 122 रुग्णांवर उपचार सुरु असून 50 जणांचा कोरोनाच्या संर्सगामुळे मृत्यू झाला आहे.
तर भुसावळातील भारत नगर मधील 1 रुग्ण, न्यु सातारा मधील 3 रुग्ण व जुन्या क्लोज कॉन्टॅक्ट मधील रिपीट 1 रुग्ण, एकाचा पत्ता माहीत नाही, जनतेला विनंती करण्यात येते की घराबाहेर पडू नका.



