भुसावळात तरुणावर गोळीबार प्रकरणी सात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील आरपीडी रोडवरील मुस्लीम कब्रस्थानाजवळ किरकोळ कारणावरून १९ वर्षीय तरुणावर गोळीबार करून तसेच त्याला फायटरने मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती.
या गोळीबारात आदित्य संजय लोखंडे 19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ हा तरुण जखमी झाला त्याला गोदावरी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले होते. या घटनेत सुरुवातीला गोळीबार झाला किंवा नाही याबाबत संभ्रम होता . मात्र जखमीचे रात्री उशिरा सीटीस्कॅन व वैद्यकीय अहवालानंतर गोळीबार झाल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणी रात्री उशीराने जखमी फिर्यादि आदित्य संजय लोखंडे 19, न्यू आंबेडकर नगर, भुसावळ याने फिर्याद दिली की सोनु लॉन्ड्री कहा है असे विचारले असता फिर्यादीने या आरोपीना मला काय माहीत असे बोलण्याचा राग आल्याने
संशयित आरोपी चिन्या याने फिर्यादीस रेल्वे हॉस्पीटल समोरील आरोपी चिना यांचे घरात व खिश्चन कब्रस्तान जवळ फोन करुन त्याचे घरी बोलावून आरोपी आतिष खरात, हंसराज, गोलु उर्फ राजन खरात, चिन्या व सुरज यांनी शिवीगाळ व चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच संशयित आतिष खरात, हंसराज व गोलु उर्फ राजन खरात यांनी फिर्यादीस गावठी पिस्तुलाने गोळी मारुन गालावर डाव्या कानाच्या मागे डोक्यावर डाव्या हाताचे अंगठ्याजवळील बोटावर दुखापत करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीजवळील मोबाईल व मोटरसाइकल हिसकावून घेतली अशी फिर्याद
दिल्यावरुन आरोपी आतिष खरात , हंसराज, गोलु उर्फ राजन खरात , चिना , सुरज , गोविंदा , कपिल कासे , सर्व रा.भुसावळ (पुर्ण नाव माहीत नाही ) या सात संशयीता विरुद्ध शहर पोलिसात भुसावळ शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरनं 77/ 2020 व कलम भाग 5 भादवी 307,396,143,147,148,149,323,504 आर्म अँक्ट 3/25,3/27.मु.पो.अं.37(1),(3)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या शोधार्थ पथक रवाना आरोपींनी केलेल्या गोळीबारात गोळी तरुणाच्या कानाला, डोक्याला लागली असून तरुणाच्या हातालाही दुखापत झाली आहे.
गोळीबाराची माहिती कळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहकार्‍यांनी घटनास्थळ जाऊन पाहणी केली . तपास सहा.निरीक्षक विनोदकुमार गोसावी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *