भुसावळ नगरपरिषदेच्‍या पथकाची १२ ठिकाणी धडक कारवाई ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथे जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्‍यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून उपविभागीय अधिकारी,उपजिल्‍हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्‍या पथकाने १२ ठिकाणी कारवाई केली .
यात चाहेल ढाबा समोरील दिलीप पटवारी यांचा वेफर्स कारखाना,खडका चौफुल्‍ली भागातील शेख रिजवान टायरवाले व खान्‍देश फेब्रीकेशन,वरणगाव रस्‍त्‍यावरील मनिरूल इस्‍लाम लष्‍कर गॅरेजवाले,म्‍युनिसिपल पार्क मधील भाजी विक्रेता अविनाश महेंद्र गोठले,सागर ठाकरे व प्रफुल घाडगे,गवळी वाड्‍यातील बब्‍बु किराणा दुकान,जळगाव रस्‍त्‍यावरील भारत रेडीएटर,जुना सातारा मधील विश्‍वकर्मा फेब्रिकेशन या १० दुकानदारांविरूध्‍द दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली.तर पुजा काॅम्‍प्‍लेक्‍स जवळील भारत ट्रेडर्स सिल करण्‍यात आले.तसेच रस्‍त्‍यावर थुंकणा-या अमळनेर येथील प्रशांत अशोक साळी यांच्‍याकडून दंड वसुल करण्‍यात आला
.या पथकात संजय बनाईते,पंकज पन्‍हाळे,सुरज नारखेडे,रामदास म्‍हस्‍के,चेतन पाटील,विशाल पाटील,किरण मनवाडे,अनिल मनवाडे,राजेश पाटील,स्‍वप्‍निल भोळे,गोपाल पाली,विजय राजपुत,योगेश वाणी,धनराज बाविस्‍कर,मयुर भोळे,मयुर भोई,दिपक शिंदे,पोलीस कर्मचारी पोकाॅ.चारूदत्त पाटील,पोकाॅ.किशोर पाटील यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *