भुसावळ विभागाने जून महिन्यात केली ४ लाख ८२ हजार टन मालाची वाहतुक ;


भुसावळ (प्रतिनिधी ) –
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने जून महिन्या मधे ४ लाख ८२ हजार टन मालाची वाहतुक लोड केली आहे .
जून महिनाभरात एकून १८३ रॅक द्वारे ८७०९ वॅगनमध्ये ही लोडींग भुसावळच्या विविध स्थानका वरुन करण्यात आली आहे . यामधे २८ रॅकद्वारे ११८३ वॅगन मधे कांदा विविध ठिकाणी पाठविण्यात आला आहे . त्यामधे १७ रॅक हे बांगलादेश येथे पाठविण्यात आले आहे व इतर रॅक पेट्रोलियम पदार्थ, डी- कोक ऑइल , सीमेंट , खते , व अन्य वस्तूची वाहतूक रेल्वे प्रशासनाने केली आहे.
भुसावळ विभागाचे प्रबंधक विवेक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वात वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा यांच्या मार्गदर्शनात मालवाहतुक करण्यासाठी विशेष सोई सुविधा पुरवित वाणिज्य विभागाने एक मोठी कामगिरी केली आहे. ऑनलाइन बैठकीद्वारे व्यापारी, उद्दोगपती, चेंबर्स ऑफ कॉमर्स, एमआयडीसी आदि
असोशिएशनच्या सदस्यां सोबत संवाद साधून त्याना मध्य रेल्वे द्वारा करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली जात आहे .
मध्य रेल्वेच्या, भुसावळ विभागातून दररोज लोडिंग अनलोडिंग साठी विविध टर्मिनल्स वर रॅक (मालगाड्या) हाताळले जात आहेत. विविध गुड्स शेड, स्थानके आणि नियंत्रण कार्यालयांमधील मध्य रेल्वेचे कर्मचारी मालगाडी सुरक्षित आणि सुरळीत चालविण्यासाठी २४ x ७ कार्यरत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *