भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील जुना सातारा भागासह परिसरात दररोज तास न तास खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना अतिशय त्रास होत असल्याने याबाबत युवासेनेचे सागर वाघोदे यांनी महावितरण अधिकारी यांना गुरुवार 9 जुलै रोजी ऑनलाइन तक्रार केली असून निवेदन देण्यात आले आहे . परिस्थिती पूर्ववत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही युवा सेना भुसावळ शहराच्या वतीने देण्यात आला आहे .
भुसावळ शहरातील जुना सातारा , कोळी वाडा ,भोई नगर ,श्री नगर, गणेश कॉलोनी , खळवाडी , मोहित नगर , भिरुड कॉलनी ,अयोध्या नगर ,शिव कॉलोनी , सह संपूर्ण जळगाव रोड कडील भागात काही दिवसांपासून विजवितरण कंपनी नागरिकांना समवेत विजेचा लपंडाव खेळत आहे . गेल्या काही दिवसांपासून थोडी जरी पाऊसाची रिपरिप सुरू झाली तरी वीजपुरवठा तास न तास खंडित होत असल्या
कारणाने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. आधीच भुसावळ शहरात प्रशासनाच्या वतीने लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला त्यात असा वेळीअवेळी वीजपुरवठा खंडित होतो यामुळे लोग घरात कसे राहू शकतील . महावितरण देत असलेल्या सेवे बद्दल नागरिकां
मध्ये प्रंचड रोष आहे.
वारंवार वीज खंडित होत आहे उन्हाळ्यात केलेली कामे ही निकृष्ठ दर्जाची आहे . याची चौकशी करून संबंधित
ठेकेदारास ब्लॅक लिस्टेड करावं.
येत्या सात दिवसाच्या आत विजेचा लपंडाव न थांबवल्यास आपल्या कार्यालयावर मेणबत्ती मोर्चा काढून याचा निषेध नोंदवू असा इशारा युवा सेनाशहर प्रमुख सागर प्रविण वाघोदे यांनी दिला आहे .



