भुसावळ (प्रतिनिधी )-
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुन पर्यंत कोरोना नियंत्रित करण्यासाठी लाॅकडाऊन घोषित केले असून त्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी चार दुकानदारां विरूध्द उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तथा भुमी संपादन अधिकारी किरण सावंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेच्या पथकाने चार ठिकाणी कारवाई केली.
यात बद्री प्लाॅट मधील भाजी विक्रेता विशाल मराठे,बालाजी लाॅन्स जवळील रिकेश ट्रेडर्स अंडे विक्रेता,महेश नगरातील संजय छबडीया व खडका रोड भागातील न्यु आमना डेअरी अशा चार जणांविरूध्द दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या पथकात संजय बनाईते,पंकज पन्हाळे,सुरज नारखेडे,चेतन पाटील,विशाल पाटील,किरण मनवाडे,अनिल मनवाडे,राजेश पाटील,स्वप्निल भोळे,अरूण सपकाळे,मयुर भोई,दिपक शिंदे,पोलीस कर्मचारी पो.काॅ.चारूदत्त पाटील,पो.काॅ.किशोर पाटील यांनी केली.



