भुसावळात कोरोना तपासणी ; दहा केंन्द्रावर नागरीकांना देता येणार स्वॅब ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनसह विविध उपाययोजना प्रशासनाकडून राबवण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत प्रभागात नागरीकांना स्वॅब देण्याची मागणी करण्यात आल्याने या मागणीची दखल घेत शहरातील दहा ठिकाणी नागरीकांना आता स्वॅब देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिनांक ९ ते २४ जुलैदरम्यान हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागरीकांची लक्षणे पाहून त्यांचे स्वॅब घेतले जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी सांगितले.
आरोग्य विभागातर्फे शहरातील १० केंद्रांवर वेगवेगळ्या तारखेला १० ठिकाणी केंद्राची निश्‍चित करण्यात आली असून सकाळी सकाळी ९ ते १२ या वेळेत नाव नोंदणी झाल्यानंतर दुपारी १२ ते २ यावेळेस स्वॅब घेतला जाणार आहे. ९ जुलै रोजी तु झ.झोपे शाळा, मेथाजी मळा, ११ रोजी शिवदत्त नगर, १३ रोजी मुस्कान हॉस्पिटल, १५ रोजी म्युन्सीपल हायस्कूल, १७ रोजी मराठा समाज मंदिर, १८ रोजी जुना सातारा नगरपालिका शाळा, २० रोजी डी.एल.हिंदी हायस्कूल, २१ रोजी एक्सेल हॉस्पिटल, २२ रोजी आदर्श हायस्कूल तर २३ रोजी महात्मा फुले नगरपालिका प्राथमिक आरोग्य केंद्रावर नागरीकांना स्वॅब देता येणार आहे.
दरम्यान, कंटेन्मेंट झोनसह शहरातील अन्य भागातील नागरीकांना स्वॅब देता येणार असले तरी कोरोनासदृश आजाराची लक्षणे आढळणार्‍या नागरीकांचेच स्वॅब घेतले जातील, असे डॉ.फलटणकर यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *