भुसावळ(प्रतिनिधी )-
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतच नसल्याने प्रशासनाने वारंवार प्रयत्न केले.
ही साखळी तोडण्या करीता नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दि.७ ते १३ जुलै पर्यंत कडक लाॅकडाऊन जाहीर केला असून तशा सुचना प्रशासन व पोलीस प्रशासनाला दिल्या आहे.
दि.७ रोजी भुसावळकरांनी १०० टक्के कडकडीत बंद पाळून चांगला प्रतिसाद दिला .
अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी मंगळवारी शहरातील सर्व पाॅईंटवर जाऊन पाहणी केली व कारवाई करण्याच्या सुचना पोलीस विभागाला दिल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी दि.८ जुलै बुधवारी सुद्धा अप्पर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांनी शहरात अचानक भेट देऊन पाहणी केली.या भेटीत त्या म्हणाल्या कि,कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.आठवड्याचा हा लाॅकडाऊन जनतेच्या हितासाठी असून सर्वांना त्याचे पालन करावे लागणार आहे.पालन न केल्यास पोलीस विभाग सुद्धा ठिकठिकाणी कारवाईसाठी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत,बाबासाहेब ठोंबे आदी उपस्थित होते.
दरम्यान शहरात नागरिकांनी दुसऱ्या दिवशी सुद्धा प्रशासनाच्या आवाहानाला उत्तम प्रतिसाद देत बुधवारी सुद्धा १०० टक्के बंद यशस्वी केला .



