वरणगाव (प्रतिनिधी )-
दीपनगर वीज निर्मिती केंद्रातीलअंकुर, साईरेल कंपनीसह अन्य कंपनीत काम करणार्या कामगारांना कोरोनाच्या काळात कामावरून कमी करण्यात आले शिवाय काही कंपन्यात कर्मचार्यांच्या पगारात कपात केली जात असल्याने कर्मचार्यांना कामावरून कमी करू नये व पगार सुद्धा देण्यात यावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असतानाही येथे नियम डावलले जात असल्याने वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी कामावरून कमी केलेल्यांना तातडीने कामावर घ्यावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
काळे यांच्या तक्रारीनुसार वेतन कपात हा एक प्रकारचा कर्मचार्यांवरील अन्याय असून काही लोकांनी दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील कर्मचार्यांना ओव्हरटाईम मिळत असताना कामगार विरोधी तक्रारी केल्यानंतर तो बंद करण्यात आला आहे. या कर्मचार्यांना देखील न्याय देण्यात यावा तसेच वरणगाव शहरातील बेरोजगार तरुणांना कंपनीत काम देण्यात यावे व कामावर घेण्यात यावे तसेच दबावापोटी काम न करता बोगस बिले काढण्यात आल्याने त्याची चौकशी करण्यासह निकृष्ट कामांची चौकशीची मागणी माजी नगराध्यक्ष काळे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांना निवेदनाद्वारे केली. प्रसंगी अधीक्षक अभियंता अहिरकर, रामटेके उपस्थित होते.



