अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहिर ; भुसावळ तालुकाध्यक्ष पदी अनिल टाक तर शहराध्यक्ष पदी सुनील लोट यांची नियुक्ती ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
अखिल भारतीय सफाई कामगार संगठन. रजि.डी.ई.एस.1885/2014.भारत सरकार नोंदनीकृत;कार्य क्षेत्र संपूर्ण भारत, शाखा महाराष्ट्र प्रदेश
अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज चावरीया यांच्या आदेशानव्ये जळगाव व भुसावळ येथील कार्याकरीता जिल्हाकार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे .
राज्यात संघटना वाढीसाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज चावरीया प्रयत्नशील असून त्या अनुषंगाने संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार वाल्मिकी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव अॅड. कबीर बिवाल ,संघटनेचे ग्रामीण प्रदेश अध्यक्ष आणि शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांच्या अनुमतीने जळगाव जिल्हा अध्यक्ष संतोष बाबू थामेत यांनी जळगाव जिल्हा आणि भूसावळ शहर कार्यकारीणी जाहीर केली आहे.
नव नियुक्त पदाधिकारी यांचे अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेने स्वागत केले असून संघटनेच्या माध्यमातून समाज आणि सफाई कामगारांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नती साठी प्रयत्नशील राहून, संघटनेच्या वाढीसाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही नवनियुक्त पादाधिकारी यांनी दिली . नवनियुक्त पदाधिकारी यांचे अखिल भारतीय सफाई कामगार संगठनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनराज चावरीया आणि प्रदेश कार्यकारिणीचे मान्यवर पदाधिकारी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.
जिल्हाकार्यकारिणी पुढील प्रमाणे
जळगाव जिल्हा व भूसावळ शहर कार्यकारीणी जिल्हा अध्यक्ष जळगाव संतोष बाबू थामेत , कायदेशीर सल्लागार अॅड. विजय भीमराव तायडे , जिल्हा कोषाध्यक्ष जयप्रकाश सुनील लोट, प्रसिध्दी प्रमूख राजेंद्र त्रंबक वानखेडे, तालुका अध्यक्ष भुसावळ अनिल चंदर टाक ,तालुका उपाध्यक्ष अजय दिपसींग ढिकयाॅव , शहर अध्यक्ष भुसावल सुनील मदन लोट,
शहर उपाध्यक्ष मनोज राजकुमार डूलगज ,
शहर कार्याध्यक्ष प्रविण राजू पंडित , शहर उप कार्याध्यक्ष पवनकुमार दास चंडाले , शहर सचिव प्रदीप उत्तम भालेराव यांचा समावेश कार्यकारिणीत करण्यात आला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *