चित्रकार मनोहर झांबरे यांना लाभला सेनाचित्र गौरव पुरस्कार; ऑनलाईन चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहिर ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिक देण्यात आले.बक्षीस वितरण समारंभा पूर्वी गुरु पौर्णिमेनिमित्त शिवसैनिकांचे राजकिय गुरु स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला माजी आमदार दिलीप भोळे यांनी पुष्पहार अर्पण केला व नंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
भुसावळ शिवसेना व युवासेना यांच्यावतीने शिवसेना वर्धापन दिनानिमित्त ऑनलाईन चित्रकला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत चित्रकारांना कोरोणा रक्षक हा विषय देण्यात आला होता व स्पर्धकांनी कोरोना रक्षक या विषयावर चित्र काढून व्हॉट्सअप याद्वारे चित्र मागवण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी डॉक्टर्स,नर्स,पोलिस व सफाई कामगार यांच्या प्रति कृज्ञतापूर्वक चित्र रेखाटले तर राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कार्याचा चित्राद्वारे गौरव केला .
स्पर्धेमध्ये भुसावळ,जळगाव धुळे यासह मुंबई वरून १५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये परीक्षक म्हणून पंकज पाटील सर व डॉ मनोज इंगळे , यांनी काम पाहिले. या मध्ये प्रथम क्रमाकांचे बक्षीस अभिजित झांबरे, द्वितीय क्रमाकाचे बक्षीस नीरजा सोनार तर तृतीय क्रमकाचे बक्षीस दिव्या भराडिया यांना मिळाले तर विशेष सेणाचित्र गौरव पुरस्कार मनोहर झांबरे यांना मिळाला आलेल्या चित्रकला स्पर्धाचे बक्षीस वितरण शिवसेनेचे माजी आमदार दिलीप भोळे, माजी नगराध्यक्ष माधुरी फालक , माजी तालुका प्रमुख नीलकंठ फालक (पंछी ) , शिवसेनेचे
उपतालुका पप्पू भैय्या बारसे, यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी विद्यार्थी सेनेचे दिपक धांडे युवा सेनेचे हेमंत बऱ्हाटे ते पवन नाले रवी फालक उपस्थित होते
स्पर्धा यशस्वितेसाठी शिवसेना शहर प्रमुख बबलू बऱ्हाटे , अँड. निर्मल दायमा , सेना जिल्हा प्रमुख चंदू शर्मा हेमंत बऱ्हाते युवा सेना शहर प्रमुख सूरज पाटील नरेंद्र लोखंडे सागर वाघोदे ,पवन नाले यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *