भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे विभागातून लॉकडाउन दरम्यान कांदा बांगलादेशांत निर्यात करण्यात आला आहे .
कांदा भुसावळ रेल्वे मंडळ विभागातील मनमाड , लासलगांव , निफाड , खैरवाड़ी , नासिक या प्रमुख स्टेशन मधून हा कांदा निर्यात करण्यात आला आहे . ह्या कांदा निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनात्मक भरघोस वाढ झाली आहे. ६ मे रोजी पहिला रेक हा लासलगांव स्टेशन हुन बांग्लादेश मधे पाठविण्यात आला आहे . आता पर्यत भुसावळ मंडळ विभागातुन एकुण ४१ रेक रवाना करण्यात आले आहे . त्यामधे मुख्यत: हे रॅक नासिक स्टेशनहुन सगळे ०७ रॅक , खेरवाडी स्टेशन न ०८ रॅक , निफाड स्टेशन हुन १० रॅक , लासलगांव स्टेशनहुन ०५ रॅक , आणि मनमाड स्टेशन हुन ११ रॅक रवाना करण्यात आले आहे . सगळे रॅक बांगलादेश मधे पाठविण्यात आले आहे . वाणिज्य आणि ऑपरेटिंग विभागाकडून लोडर्ससह विडियो कॉन्फरन्स द्वारे सखोल विपणन बैठका घेण्यात आल्या . यामुळे बांगलादेशात मधील दरशना , बेनापोल , आणि रोहनपुर स्थानकात कांद्याची निर्यात सुरु झाली आहे . मे आणि जून महीन्यात एकून ४१ रॅक मधून १ लाख टन कांदा बांगलादेशात निर्यात करण्यात आला आहे .



