नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावर प्रा डॉ एल ए पाटील साधणार संवाद ;


वरणगाव (प्रतिनिधी )-
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, अमळनेर तालुका विज्ञान व गणित अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय नॅनो तंत्रज्ञान व समाज या विषयावरती अमळनेर येथील सेवानिवृत्त प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर एल ए पाटील ऑनलाइन वेबिनार च्या माध्यमातून सोमवार दिनांक ६ रोजी दुपारी ४ वाजता संवाद साधणार आहेत.
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या फेसबुक पेज वरून या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असून नॅनो तंत्रज्ञान म्हणजे काय त्याचा समाजावर ती भविष्यात होणारा परिणाम यासह इतर बाबींची माहिती दिनांक ६ सोमवार रोजी दुपारी चार वाजता देण्यात येणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे माजी राज्य समन्वयक किशोर राजे असतील तर याच कार्यक्रमांमध्ये नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट भारत या संस्थेचे महाराष्ट्राचे संचालक संदीप पाटील हे शिक्षकांना वैज्ञानिक कार्यक्रमांविषयी माहिती देणार आहेत या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शिक्षक विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचे आवाहन करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *