भुसावळ (प्रतिनिधी )-
तिकीट चेकिंग स्टाफ ला आपले काम करताना खूप अडचणीचा सामना करावा लागत असे , गाडी मध्ये प्रवाशाचे तिकीट चेक करताना जवळून चेक करणे , स्टेशन वर तिकीट चेक करणे या समस्या येत होत्या त्यामुळे रेल्वे प्रशासन च्या वतीने भुसावळ विभागातील सर्व तिकीट चेकिंग स्टाफ कोरोनाचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने तिकीट चेकिंग स्टाफला फेस शिल्ड आणि भिंग काच देण्यात आले आहे. जेणे करून आपले आरोग्य चांगले राखता येईल आणि प्रवाशांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे करता येईल .



