भुसावळ (प्रतिनिधी )-
रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना प्रवाशांना सोबत संवाद साधण्यासाठी भुसावळ मंडळ मधील सर्व आरक्षण केंद्रांच्या खिडकी वर टू वे माइक सिस्टम ची सोय करण्यात आली आहे . प्रवासी आरक्षण करण्यासाठी आरक्षण केंद्रां वर येत असतात आणि रांगेत असताना त्यांना फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून आणि रेल्वे आरक्षण कर्मचाऱ्यांना पण फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करून संवाद साधावा लागत असतो त्यामुळे खूप अडचणी येत असतात म्हूणन रेल्वे प्रशासनाच्या वतीने सर्व आरक्षण खिडकीवर टू वे माईक सिस्टम ची सोय केली आहे कि जेणे करून प्रवाशांना नीट संवाद साधता येईल .या माध्यमातून रेल्वे आरक्षण कर्मचारी हे प्रवाशांचे बोलने रीतसर समजून घेऊ शकता. आणि यामुळे प्रवाशांसोबत संवाद साधने सोयीचे झाले आहे . आरक्षण खिडक्यांवर बाहेरील बाजूस प्रवाशांचे बोलणे ऐकून घेण्यासाठी स्पीकर लावण्यात आले आहे कि जेणे करून प्रवाशांना सोयीचे होईल.



