भुसावळ(प्रतिनिधी )-
येथील आशिया महामार्गावरील नवोदय विद्यालय कोविड सेंटरमधून बेपत्ता झालेली ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुसर्या दिवशी शोध लागला असून ही वयोवृद्ध महिला जळगाव येथील राजकमल टॉकीज परीसरात आढळून आली असल्याची माहिती वयोवृद्धेच्या होमगार्ड असलेल्या मुलाने दिली आहे. मनोरुग्ण असलेली ही वयोवृद्धा दि.३० जुन रोजी सकाळी १०-३० वाजेच्या सुमारास अचानक कोविड सेंटरमधून बेपत्ता झाल्याने कोविड सेंटरमधील रामभरोसे कारभार उघड झाला होता. शिवाय दोषींवर कारवाईची मागणी केली जात होती. होमगार्ड असलेल्या वयोवृद्धेचा मुलासह त्याच्या मित्राने मंगळवार व बुधवारी सर्वत्र शोध घेतल्यानंतर जळगावात ही वयोवृद्ध महिला आढळल्याने कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.



