भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे शहरातील डॉक्टरांचा डॉक्टर्स डे निमित्त सत्कार


भुसावळ (प्रतिनिधी )-
जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिपभैय्या पाटिल यांचे आदेशान्वये भुसावळ शहर काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाद्वारे बुधवार १ जुलै रोजी डॉक्टर दिना निमित्त शहरातील डाँक्टरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यात कोरोना काळात जनतेसाठी वरदान ठरलेले डाँ.राजेश मानवतकर, डाँ.विनायक महाजन,नगर परिषदेचे डाँ.फलटणकर मँडम,डाँ तौसिफ,डाँ शिराज हुसेन,डाँ.दिलीप अत्तरदे यांचा यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील व जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा सरचिटणीस रहीम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार संपन्न झाला. यावेळी योगेंद्र पाटिल,विवेक नरवाडे,रहिम कुरेशी,ईस्माइल गवळी, अनु जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनिल जोहरे,उपाध्यक्ष विनोद पवार,विजय तुरकेले,दिलीप क्षिरसागर, संदिप मोरे उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *