मा.आ.संतोष चौधरी व गटाने खोटे आरोप- प्रत्‍यारोप करू नये -भाजप पत्रपरिषदेतील सुर ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
सत्ताधा-यांवर खोटे नाटे आरोप लावणा-या विरोधक व माजी आमदार संतोष चौधरी यांनी आता हे सर्व सोडून शहरातील विकास कामांसाठी पुढाकार घ्‍यावा असा सुर भाजपतर्फे आज दि.१ जुलै रोजी लोणारी हाॅल मध्‍ये घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत एकमुखी सुर निघाला.
भाजप जिल्‍हा संघटन सचिव तथा नगरसेवक प्रा.सुनिल नेवे म्‍हणाले कि,माजी नगराध्‍यक्ष उमेश नेमाडे यांनी वरणगाव-हतनुर येथील राज्‍य राखीव पोलीस दल केंद्र सरकारने अहमदनगर जिल्‍ह्‍यात हलवल्‍याने आ.संजय सावकारे यांना अकार्यक्षम म्‍हटले तर जनआधार विकास पार्टीने सुध्‍दा खोटे आरोप लावले.मुळात या केंद्रासाठी आ.सावकारे यांनी विधानसभेत विषय मांडले होते.सन १९९९ मध्‍ये तत्‍कालीन मंत्री ना.मुंडे,ना.खडसे व ना.जैन यांनी या केंद्राचे भूमीपूजन केले होते.सन २००४-०९ मध्‍ये राष्‍ट्रवादी व काँग्रेसची सत्ता असतांना संतोष चौधरी हे आमदार असतांना तत्‍कालीन गृह राज्‍यमंत्री माणिकराव ठाकरे यांनी हा प्रकल्‍प पांढरकवडा येथे पळवून नेला होता.त्‍यावेळी संतोष चौधरी यांनी प्रकल्‍प रोखण्‍यासाठी कुठलाही पत्रव्‍यवहार किंवा आंदोलन केले नव्‍हते.विधानसभेत प्रश्‍न विचारले नाही.कार्यक्षम कोण अकार्यक्षम कोण हे यावरून सिध्‍द होते.सन २००९-१४ दरम्‍यान विपक्ष नेते असतांना एकनाथ खडसे व आ.सावकारे यांनी विधानसभेत एकत्र येऊन सरकारला जाब विचारला होता.भाजप सेना युतीची सत्ता आल्‍यानंतर तत्‍कालीन मुख्‍यमंत्री फडणवीस यांनी या केंद्रासाठी ८१ व ५६ असा १३७ कोटी रू.निधी मंजूर केला होता.शेतक-यांच्‍या जागेऐवजी शासकिय जागेवर हे प्रकल्‍प होणार होते.आ.सावकारे यांचे हे मोठे यश होते.जिव ओतून प्रकल्‍पासाठी काम करूनही या सरकारने ते प्रकल्‍प अहमदनगर जिल्‍ह्‍यात हलवले.अशावेळी तर पक्ष बाजुला ठेवून राजकारण न करता एकत्र येऊन काम करण्‍यासाठी पुढाकार घ्‍यायला हवा किंवा आपण स्‍व:त तरी प्रयत्‍न करावे.एमआयडीसी मध्‍ये रस्‍ते,वीज,पाणीप्रश्‍न आदी सोडवल्‍याने उद्‍योग आले.आ.सावकारे यांनी मा.आमदार संतोष चौधरींबद्‍दल एकेरी शब्‍दाचा वापर केला मात्र यापुर्वी निवडणुकीत संतोष चौधरींनी एकेरी भाषा,शिवीगाळ सुध्‍दा करून सुरूवात केली आहे.आता हे आरोप प्रत्‍यारोप बंद व्‍हायला पाहिजे. नगराध्‍यक्ष रमण भोळे यांनी सांगितले कि,आमदार संजय सावकारे व नगरपरिषदेने अनेक विकासकामे केली हे सर्व जनतेसमोर आहे.आ.सावकारेंमुळे बरेच उद्‍योग आले व अनेक तरूणांना रोजगार मिळाला.आ.सावकारेंची बदनामी करण्‍याचा प्रयत्‍न सद्‍ध्‍या सुरू असुन कोरोना आढावा बैठक,जिल्‍हाधिकारी बैठक,केंद्रीय आरोग्‍य पथकाशी चर्चा,स्‍थानिक प्रशासन व पोलीसांसोबत समन्‍वय ठेऊन कायम आ.सावकारे व मी सोबत राहीले.नगरपरिषद रूग्‍णालय व ग्रामीण मध्‍ये सुमारे ५० लाखांचे साहित्‍य आ.सावकारे यांनी उपलब्‍ध करून दिले आहे.नगरपरिषदेच्‍या निवडणुका डोळ्‍यासमोर हे सर्व सुरू आहे.नगरपरिषदेतर्फे प्रत्‍येक प्रभागात सुरू असलेल्‍या विकास कामांमुळे विरोधकांची पोटदुखी होत आहे. विरोधकांनी आधी स्‍वत:चे कर्तुत्‍व बघावे व नंतर या निष्‍क्रिय लोकांनी आरोप करावे,नगरपरिषदेच्‍या माध्‍यमातून नोकर भरती करून बेरोजगार तरूणांकडून किती अफाट पैसा हडप केला हे जगजाहीर आहे.पिंटू कोठारी यांच्‍या साईजीवन सुपर शाॅपी मुळे भुसावळ शहरात कोरोना रूग्‍ण वाढत असल्‍याचा आरोप काही विरोधक करीत आहे मात्र त्‍यांनी कठीण काळात हजारो गरीब व गरजुंची सेवा केली आहे.भुसावळ शहराचे खरे शिल्‍पकार हे संतोष चौधरी नव्‍हे तत्‍कालीन मुख्‍याधिकारी एच.बी.भोंगळे होते असे मा.प्र.नगराध्‍यक्ष युवराज लोणारी म्‍हणाले. भाजप नगरपरिषद गटनेते हाजी मुन्‍ना तेली म्‍हणाले कि,कुणावर टिका न करता आ.सावकारे यांनी शहरातील विविध भागात अनेक कामे केली.कोरोना मोठ्‍या प्रमाणात वाढत असून ही वेळ वाद करायची नाही.सद्‍ध्‍या मतभेद विसरून सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन काम करायला हवे अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली.
भाजप शहराध्‍यक्ष दिनेश नेमाडे यांनी आ.सावकारे यांनी केलेल्‍या प्रशासकिय कार्यालय,तहसिलदार कार्यालय,ट्रामा सेंटर आदी मोठ्‍या कामांची आठवण करून दिली. यावेळी हाजी शफी पहेलवान,वसंत पाटील,प्रमोद नेमाडे,पुरूषोत्तम नारखेडे,पिंटू कोठारी,मुकेश पाटील,अजय नागराणी,अॅड.बोधराज चौधरी,देवा वाणी,सतिष सपकाळे,परिक्षित ब-हाटे,राजेंद्र आवटे,किरण कोलते,गिरीश महाजन,पवन बुंदेल,अमोल महाजन आदी उपस्‍थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *