‘

नवी मुंबई –
अमरावती जिल्ह्यातील ‘अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था’ च्या ठाणे जिल्हा सचिव पदी नवी मुंबईतील पत्रकार अनंत कुमार गवई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
‘अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था’चे अध्यक्ष शरद मेहरे यांनी ‘संस्था’च्या ठाणे जिल्हा सचिव पदी नवी मुंबईतील दिघा येथे राहणारे ‘साप्ताहिक पांढरी टोपी’चे संपादक अनंतकुमार ओंकार गवई यांची निवड केली आहे.
‘अखिल पत्रकार कल्याण बहुउद्देशीय संस्था’च्या नियमांचे पालन करुन, ‘संस्थां’ची उद्दिष्टे, ध्येयधोरणे ठाणे जिल्ह्यातील सर्वसामान्य पत्रकारांपर्यंत पोहोचवून तळागाळातील पत्रकारांची प्रगती होण्यासाठी आपण यापुढे कर्तव्य तत्परतेने कार्य करीत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया नियुक्तीनंतर अनंतकुमार गवई यांनी व्यक्त केली.


