भुसावळातील नगरसेविका नगरसेविका अनिता सोनवणे अपात्र ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील प्रभाग क्रमांक सात- अ मधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेतून निवडून आलेल्या नगरसेविका अनिता सोनवणे यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे.
भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सात- अ मधून अनिता एकनाथ सोनवणे या अनुसूचित जमाती महिला राखीव जागेतून निवडून आलेल्या आहेत. मात्र त्यांनी मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. यासंदर्भात हुडको कॉलनीतील रहिवासी केदार सानप यांनी तक्रार दाखल केली होती यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करून त्यांना अपात्र घोषित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *