भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवसेना नेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख व आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन यांच्या नेतृत्वाखाली दैनंदिन जीवनात स्वतःला कोरोनापासून कसे वाचवाल? या विषयाावर भुसावळ शिवसेनेतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत नाशिक, जळगाव, बुलढाणासह राज्यभरातील ३८ स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत नाशिकच्या श्रेया विनोद चिनावलकर व दर्यापूरची सायली यशवंत तायडे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. लहान गटात भुसावळच्या हिमाक्षी पंकज भोळे, न्हावीच्या यशश्री प्रवीण चौधरीने अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला. भुसावळच्या साक्षी शशिकांत दुसाने हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.यावेळी विजयी स्पर्धकांना बक्षीस शिवसेना तालुका संघटक व स्पर्धेचे संयोजक प्रा.धिरज पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे यांचे हस्ते बक्षिस देण्यात आले . या स्पर्धेस
शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनेचे सहकार्य स्पर्धेत लाभले.
स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती उद्देश सफल: समाधान महाजन
कोरोनापासून बचाव करण्यासाठी वेगवेगळ्या काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घरातील प्रत्येकाला प्रतिबंधात्मक उपाय काय करावे लागणार आहे याची जाणीव असली पाहिजे म्हणून वक्तृत्व स्पर्धेत तोच विषय घेतला होता. स्पर्धेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती करण्याचा उद्देश सफल झाला. बाहेर गावी असेलेल्या विजेत्यांना प्रथमच ऑनलाईन गिफ्ट पाठवून बक्षीस वितरण करण्याची नवीन संकल्पना भुसावळ शिवसेनेच्या वतीने मांडली गेली व सोशल डिस्टन्सचे पालन केले अशी माहिती तालुका प्रमुख समाधान महाजन यांनी दिली.
शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत समान कामगिरी: प्रा.धिरज पाटील
ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत वयाची अट, विषयांचे व वेळेचे त्याचप्रमाणे शब्दांचे बंधन लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातून ३८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत समान कामगिरी बजावली. दरवर्षी अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून स्पर्धकांना त्यांचे वकृत्व तसेच आपल्या विचारांचे कौशल्य दाखविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल असे शिवसेना तालुका संघटक व स्पर्धेचे संयोजक प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले.



