काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे ” शहीदों को सलाम दिवस” संपन्न ; गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील काँग्रेस अनु.जाती विभागातर्फे भुसावळ शहरातील नाहटा काँलेज जवळील कारगिल शहिद स्मारकाजवळ शुक्रवार २६ जून रोजी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या २० भारतीय जवानांना मेणबत्ती पेटवून
श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच
चीनच्या कार्यवाहीवर निषेध म्हणून “शहीदों को सलाम दिवस” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अँड.संदिप पाटिल यांच्या आदेशानुसार गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक योगेंद्र पाटील,जळगांव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे,जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी,उपाध्यक्ष इस्माईल गवळी,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इमरान खान,विक्रम वानखेडे,मयुर साळवे,कैलास अहिरे,दिलीप क्षिरसागर,नासीर शेख,गफ्फुर गवळी आदि उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *