भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील देवांग महेंद्र शाह यांना विश्वासात घेऊन १३ क्विंटल ६६० ग्राम वजनाचा व ७७ लाख ७४ हजार ४०८ रू.किमतीच्या काजुचे संगनमताने कटकारस्थान रचून पैसे न देता या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी दिपक सुरेश पेंडणेकर व दर्शना प्रकाश पवार या दोघांविरूध्द भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ७५/२०१९,कलम ४२०,४०६ व १२० ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी दिपक सुरेश पेंडणेकर,मुंबई याने भुसावळ येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्या न्यायालयात नियमित जामीनासाठी न्यायाधिश श्री.बंसाली यांच्याकडे तर दर्शना प्रकाश पवार या महिलेतर्फे सुध्दा अटकपुर्व जामीनासाठी न्यायाधिश एस.पी.डोरले यांच्या न्यायालयात अर्ज दाखल केले असता दोघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले. सरकारतर्फे सरकारी वकील अॅड.विजय खडसे,मुळ फिर्यादी तर्फे अॅड.बी.डी.गामोट व अॅड.राजेन्द्र टी.राॅय तर आरोपी तर्फे अॅड.कुळकर्णी व अन्य वकीलांनी काम पाहीले.



