घड्याळ विक्रीच्या दुकानांना अधिकाधिक दिवस परवानगी मिळावी – घड्याळ विक्रेत्यांची मागणी ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळात सातत्याने कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने प्रशासनाने दुकानदारांना आठवड्यातून ठरावीक दिवस व वेळेत दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे मात्र आधीच व्यवसायात मंदीचे वातावरण असल्याने दुकानांना आठवड्यातून जास्तीत-जास्त दिवस परवानगी द्यावी, अशी मागणी भुसावळातील घड्याळ विक्रेत्यांनी सोमवारी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांना निवेदनाद्वारे केली. आठवडे बाजारातील प्रकाश वॉच कंपनीचे प्रकाश द्वारकादास बिजलानी यांच्या निवेदनानुसार, शहरात पाच ते सात घड्याळ विक्रीची दुकाने असून अन्य गिप्ट आर्टीकल्स दुकानावरही घड्याळांची विक्री होत असल्याने व्यवसायावर परीणाम होत आहे. प्रशासनाने आठवड्यातून अधिकाधिक दिवस व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांच्यासह शहरातील घड्याळ व्यावसायीकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *