रूग्णालयातुन पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली सुट्टी


भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पाश्वभुमिवर जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र लढणाऱ्या फैजपूर व सावदा येथील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना भुसावळ येथील रेल्वे कोविड रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज दि.१५ जुन सोमवार रोजी त्यांच्या तब्येती मध्ये सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले .सहकारी पोलीसांनी व नागरीकांनी त्यांच्या वर फुलांची उधळण करीत त्यांचे स्वागत केले.
कोरोनाशी यशस्वीपणे लढा देऊन कर्मचारी सुखरूप घरी परत येत आहेत. अजुनही कोरोनाचा लढा संपलेला नाही .सर्वानी काळजी घेणे गरजेचे आहे .कर्मचाऱ्यांनी स्व:त व परीवाराची काळजी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी यावेळी केले . याप्रसंगी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे , बाजारपेठचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, तालुक्‍याचे पोलीस निरीक्षक रामकृष्‍ण कुंभार यांच्या सह सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *