भाजपचे धांडे,लोखंडे पुन्हा शिवसेनेत ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
काही वर्षांपुर्वी शिवसेनेतुन भाजपात गेलेले दोन माजी नगरसेवक पुन्‍हा शिवसेनेत परत आले आहे.
राज्‍याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्‍ह्‍याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्‍ते माजी नगरसेवक दीपक धांडे व माजी नगरसेवक अॅड.नरेंद्र लोखंडे यांना शिवसेनेत प्रवेश देण्‍यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष निळकंठ(पंछी) फालक,अॅड.निर्मल दायमा आदी उपस्‍थित होते.
धांडे व लोखंडे यांच्या प्रवेशाचे शिवसैनिकांनी स्वागत केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *