भुसावळ (प्रतिनिधी )– शिवसेना भुसावळ शहर तर्फे तापी नदी काठावरील स्मशान-भूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आगामी वाढदिवसानिमित्ताने शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ,युवासेनेचे मिलिंद(गोलू) कापडे,शिवसैनिक उमाकांत(नमा)शर्मा, धीरज वरढोणकर,गोसेवक रोहित महाले उपस्थित होते.
भुसावळातील सर्व नागरिकांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन सुध्दा नगरसेवक मुकेश गुंजाळ यांनी यावेळी केले.



