अ.भा.ग्राहक पंचायतीची जिल्हा बैठक व्हिडिओ कान्फरंसींग द्वारा संपन्न ;

पारोळा – अ.भा.ग्राहक पंचायतीची जिल्हा बैठक व्हिडीओ कान्फरंसींग या माध्यमाद्वारे 3 जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या राज्य ग्राहक संरक्षण परिषदेवरील अशासकिय सदस्य तथा ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष विकास महाजन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत सद्य परिस्थीतीत ग्राहकोपयोगी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या अवाजवी किंमती आणि त्यामुळे ग्राहकांची होणारी लूट,आणि त्याकडे अधिकारी वर्गाने सोयीस्कररित्या केलेले दुर्लक्ष याबाबत राज्य अन्न आयोगाकडे तक्रार करण्याचे एक मताने ठरले. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद नियुक्त्या, ऑन लाइन तालुका बैठका घेणे,या सह संघटनात्मक बाबींवरही यावेळी चर्चा झाली. बैठकीत प्रा.डॉ.अविन्त पाटील (जळगाव )अशोक महाजन ( रावेर), केदारनाथ पाटील ( चोपडा ), डॉ.प्रविण माळी (पाचोरा),सौ.लीना मराठे -नखोद (नासिक ),प्रा.अर्चना भोसले (जळगावं ),संजय पाटील ( पारोळा),अँड भारती अग्रवाल (अमळनेर ),आनंदराव साळुंखे (चाळीसगाव), दिनेश तायडे ( धरणगाव), अँड. जास्वंदी भंडारी ( भुसावळ ), विलास सोनवणे ( चाळीसगाव) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बैठकीचे सूत्र संचालन ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.अविन्त पाटील यांनी केले तर आभार अँड जास्वंदी भंडारी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *