भुसावळ (प्रतिनिधी )-
भरधाव दुचाकी शिवपुर कन्हाळा एमआयडीसी मधील गोडाऊनच्या भिंतीला आदळल्याने झालेल्या अपघातात एक तरूण ठार तर एक जण जखमी झाला आहे.सदर घटना आज दि.५ जुन शुक्रवार रोजी रात्री एमआयडीसी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार दुचाकी चालकाचा एमएच १९ बीवाय १२६९ वरील अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्त्यावरून घसरली व रस्त्यावरील गोडाऊनच्या भिंतीवर धडकल्याने या अपघातात आसिफ इमाम गवळी (वय २८) याचा मृत्यू झाला तर त्यांच्या सोबत असलेला अन्सार रशीद गवळी (वय २२) हा जखमी झाला. आसिफ गवळी हा मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्याचा रहिवासी असून लहानपणापासूनच आपल्या मामाच्या घरी राहत होता. त्याच्या वडीलाचे दीर्घ आजारामुळे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्याच्या पश्चात आई,मोठी बहीण व लहान भाऊ आहे. जखमी झालेल्या अन्सार गवळी यांच्यावर भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेमुळे शिरपूर गावात शोककळा पसरली असून या घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी धाव घेतली.रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद नव्हती.



