पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती घरात राहून साजरी करा – विशाल ठोके ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सर्व समाजबांधवांनी अत्यंत साधेपणाने शांततेने घरात राहूनच साजरी करावी असे आवाहन धनगर समाज मल्हार सेना भुसावळ शहर अध्यक्ष विशाल प्रल्हाद ठोके यांनी केले आहे. या वर्षी कोरोना या महामारीमुळे,जगभरात अनेक निष्पाप नागरिकांना या मुळेच जीव गमवावा लागत आहे,या भीषण महामारीवर अजून पर्यंत औषधं सापडले नसल्यामुळे आपण प्रत्येक समाज बांधवांनी आपली स्वतःची व परिवाराची काळजी घ्यावी व म्हणून ३१ मे रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आपण सर्वजण घरीच राहून अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमे समोर दिवा लावून साधेपणाने जयंती साजरी करावी असे आवाहन धनगर समाज मल्हार सेना भुसावळ शहर अध्यक्ष विशाल प्रल्हाद ठोके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *