शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे तीन महिन्याचे घरगुती वीज बिले माफ करा : मंगेश पाटील ; ऊर्जामंत्री यांना दिले निवेदन ;


भुसावळ (प्रतिनिधी )-
शेतकरी व सर्वसामान्य जनता यांचे तीन महिन्याचे घरगुती वीज बिले माफ करावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव मंगेश सुभाष पाटील यांनी केली असून याबाबत ऊर्जामंत्री यांना निवेदन दिले आहे .
कोरोना व्हायरसमुळे भारतात लाॅकडाऊनसह संचारबंदी जाहीर झाली होती. १५ एप्रिल पासून पून्हा ३० मे पर्यंत लाॅकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला. त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग व सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत आला आहे.
सद्यस्थितीत कांदा, गहू , फळभाज्या यासारखी पिके घेऊन आपल्या वर्ष भरातील खर्चाची बेगमी करण्यात व्यस्त असणारा शेतकरी वर्ग या वर्षी कोरोनाच्या संकटाला तोंड देताना घायाळ होऊन हताशपणे शासनाच्या मदतीच्या अपेक्षेवर डोळे लावून बघत आहे. शेतात फळ भाज्या इत्यादी पिके तयार आहेत. पण काढायला मजूर नाहीत. फळाना बाजारपेठ नाही. बाजारात गिर्‍हाईक नाही. अशा कठीण परिस्थितीत आर्थिक संकटात येथील शेतकरी सापडला आहे. शेतमजुरीची कामे थांबलेली आहेत. त्यामुळे दिवस मजुरीवर उदरनिर्वाह करणारा मजुर वर्ग अडचणीत सापडला आहे. शासन अन्नधान्य देत आहे. हे जरी सत्य असले तरी ते पुरेसे नाही. शासनाकडून देण्यात येणाऱ्या अन्नधान्यातून संपूर्ण कुटुंबातील व्यक्तीची भुक भागणेही कठीण आहे. आणि अशा महाभयंकर आर्थिक संकटात शेतकरी वर्ग सापडला आहे.
तसेच परिस्थितीत महिन्यांतील शेतकऱ्यांची घरगुती विज बिले माफ करावीत आणि विज ग्राहकांना दिलासा द्यावा. कोरोणा विषाणू मूळे चालू असलेले लॉक डाऊन लक्षात घेता गोर गरीब वर्ग हा आप आपल्या घरीच आहे .म्हणून या वेळेस उदार निर्वाह करण्याची फार बिकट परिस्थिती आहे . सर्व लोक घरीच असल्यामुळे विजेवर चालणारी उपकरण जास्त प्रमाणात वापरण्यात येत आहे म्हणून आपण तीन महिन्याचे बिल माफ करून लवकरात लवकर जनतेला चिंतामुक्त करावे. विज बिल भरावे की नाही हे आतापर्यंत याचा काही ठराविक निर्णय आलेला नाही तरीही यावर विचार विनिमय करून निर्णय द्यावा , महाराष्ट्र वीज वितरण कंपनीला सुद्धा फार मोठ्या प्रमाणात खर्च असतो याची पण काही शंका नाही पण लोक हितामध्ये निर्णय घ्यावा अशीही मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जळगाव मंगेश सुभाष पाटील यांनी केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *