आयुध निर्माणीतील कर्मचार्‍यांचे अन्न त्याग करून निषेध

वरणगाव (प्रतिनिधी )-
देशभरातील ४२ आयुध निर्माणीमधील कर्मचार्‍यांनी केंद्र सरकारच्या आयुध निर्माणी व आयुध निर्माणी बोर्ड निगामीकरण विरोधात आई.एन.डी.डब्ल्यू.एफ., ए.आई. डी.एफ.व बी.पी.एम.एस. कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त कृती समितीने दंड थोपटले असून शुक्रवारी आयुध निर्माणी वरणगाव कर्मचारी सुद्धा यात सहभागी होते. कर्मचार्‍यांनी सकाळी कामावर काळ्या फिती लावून व दुपारी जेवणावर बहिष्कार टाकून निषेध नोंदविला. यामध्ये देशभरातील ८२ हजार कर्मचारी सहभागी झाले असल्याचे संयुक्त संघर्ष समिती सदस्य बी. बी. सपकाळे यांनी कळविले आहे आणि जो पर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तो पर्यंत लढा तीव्र होऊन संघर्ष सुरु राहील, असेही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *