भुसावळात देशी-विदेशी दारूची विक्री,दोघांविरूध्‍द कारवाई

भुसावळ (प्रतिनिधी )-
शहरातील शिवाजी नगर भागात महादेव मंदिराजवळ देशी दारूची तर मुरकटी गल्‍लीत विदेशी दारू व बिअरची बेकायदेशीर विक्री होत असल्‍याची गुप्‍त माहिती पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांना मिळाल्याने बाजारपेठ पोलीस पथकाने धडक कारवाई केली. यात विक्रांत उर्फ विक्की गणेश देवपुजे(वय २८)रा.शिवाजी नगर यास महादेव मंदीराजवळ देशी दारूच्या १८० मिलीच्‍या ७ बाटल्या एकुण ३६४ रू.किमतीच्‍या विक्री करतांना ताब्‍यात घेण्‍यात आले.
तर शिवाजी नगर भागातील मुरकटी गल्लीत गौरव राजेंद्र वाघ(वय २८) रा.शिवाजी नगर हा स्वतःच्या फायदासाठी १ हजार १३० रु.किमतीच्या विदेशी कंपनीच्या दारु त्यात 520 रू.किमतीच्या विदेशी दारुच्या २८० मिली.४ बाटल्या,२८० रु.किमतीच्‍या विदेशी कंपनीच्‍या २ बाटल्या,३३० रु.किमतीच्या विदेशी कंपनीच्‍या २ बिअर बाटल्या जप्‍त करण्‍यात आल्‍या. या प्रकरणी दोघांविरूध्‍द वेगवेगळे मुंबई प्रोव्हीशन अॅक्ट कलम-६५ (ई)प्रमाणे गुन्‍हे दाखल करण्‍यात आले आहे.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड,पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.अनिल मोरे,संदिप परदेशी,पोना.रविंद्र बिह्राडे,रमण सुरळकर,उमाकांत पाटील,तुषार पाटील,महेश चौधरी समाधान पाटील,पोकाॅ.विकास सातदिवे,कृष्णा देशमुख,ईश्वर भालेराव,प्रशांत परदेशी यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *