भुसावळ डीआरएम कार्यालयाच्या इमारतीला 100 वर्ष पूर्ण :

भुसावळ (प्रतिनिधी )-
भुसावळ रेल्वे मंडळाचे मुख्यालय म्हणजेच विभागीय रेल प्रबंधक कार्यालय (डीआरएम कार्यालय) याला आज २५ मे रोजी शंभर वर्ष पूर्ण झाले आहे. दिनांक २५ मे १९२० मध्ये कार्यालयाची स्थापना झाली होती. या कार्यालयातून संपूर्ण भुसावळ विभागाचे कामकाज केले जाते. या कार्यालयात महत्वपूर्ण विभाग नियंत्रण कक्ष सर्व विभाग आहेत आणि या विभागातून संपूर्ण भुसावळ मंडळाची देखरेख व नियंत्रण केले जात असते. तत्कालीन इंजिनीयर जे एच फॅन्शवॉ यांच्या हस्ते दिनांक २५ मे १९२० रोजी या इमारतीची पायाभरणी झाली होती तर मे.चेलाराम अँण्ड चत्रुमल कॉन्टॅक्टर्स यांनी इमारतीचे बांधकाम केले होते. तेव्हापासून आजपर्यंत रेल्वेच्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार असलेली ही इमारत आजही मोठ्या दिमाखात उभी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *