जळगाव –
मुलूंड येथून अकोल्याकडे पायी निघालेल्या कुटुंबातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना नशिराबादनजीक 19 मे रोजी घडली होती. अपहरणानंतर आरोपीने मुलीला लोणीजवळ सोडून पलायन केल्याने त्याचा कसून शोध सुरू करण्यात आला होता. अखेर सहा दिवसांनी आरोपीला अटक करण्यात यंत्रणेला यश आले आहे. गणेश सखाराम बांगर (32, रा.मालेगाव, जि.वाशीम) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीं आंबेगाव, जिल्हा पुणे येथून नाशिककडे येताना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश आले.



