अभाविपने राजकारणा पोटी विद्यार्थ्यांच्या आरोग्या सोबतखेळू नये – सुरज पाटील;

भुसावळ (प्रतिनिधी )-
कोरोनाचे संकट दारावर उभे असून अभाविप ( ABVP) ला राजकारण सुचत आहे. आज संपुर्ण जग कोरोनाच्या विरोधात लढत असुन आपआपल्या घरात राहून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी आपल्या गावी असल्याने विद्यार्थी प्रवास करून परीक्षा देण्यासाठी आल्याने कोरोनाचा प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्यला धोका निर्माण होऊ शकतो. त्यातच अभाविप (ABVP)ने शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी मुख्यमंत्री, राज्यपाल व उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री यांना निवेदन दिले आहे, यातच अभाविप ( ABVP)ची मागणी ही विद्यार्थ्यांच्या धोक्याची आहे.हा राजकारण करण्यायोग्य वेळ नाही आहे परंतु सरकार घेत असलेल्या योग्य निर्णयचा विरोध करून राजकारण केले जात आहे असे युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील म्हणाले.
मार्च महिन्याच्या मध्यातच विद्यार्थी गावाकडे आहेत.त्याना अचानक वसतिगृह सोडावे लागल्याने वह्या, पुस्तके तेथेच राहीले आहे. विद्यार्थ्यांची या कोरोनाच्या संकटावर अभ्यास करण्याची मानसिकता सुद्धा राहीलेली नाही आहे. व आॅनलाईन अभ्यासावर मर्यादा आल्याने व नेटवर्क समस्या असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा अभ्यास होऊ शकलेला नाही आहे.अशा स्थितीत परीक्षा देणे अवघड आहे असे त्यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्राच्या बाजुला असलेल्या अनेक राज्यामध्ये अभाविप (ABVP)ने सर्वच वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्या साठी मागणी केली आहे. परंतु महाराष्ट्रमध्ये ठाकरे सरकार असल्याने मुद्दाम याचा विरोध अभाविप ( ABVP) करीत आहे.अशा संकटाच्या काळात राजकारण करत आहे, मुद्दाम परीक्षा घेण्याची मागणी करत आहे, परीक्षा घेत असताना कोणत्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाल्यास त्याची जवाबदारी अभाविप (ABVP)घेईल का असा सवाल सुरज पाटील यांनी मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *