भुसावळ बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशन तर्फे बॅरिकेट्स भेट ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पोलीस विभागाला शहरातील विविध भाग सील करावे लागत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक असलेले बॅरिकेटसची कमतरता असल्याने व आज घडीला कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाऊनच्या नियमांचे अतिशय काटेकोरपणे पालन करण्याची गरज लक्षात घेऊन भुसावळ तालुका बिल्डिंग मटेरियल व्यापारी असोसिएशन यांच्यातर्फे महाराष्ट्र पोलीस, भुसावळ उपविभागाकडे २० बॅरिकेट्स उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व बाजारपेठ पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत साहेब यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष विकास पाचपांडे, उपाध्यक्ष पंडित भिरूड,प्रिन्स गुजराल,मनोज अगीचा,संजय काळे,पवन ओगले,सतीश ओगले, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *