भुसावळ (प्रतिनिधी )-
संपूर्ण जगासह भारतात कोरोना विषाणुने थैमान घातले आहे या विषाणूचा झपाट्याने वाढणारा प्रादुर्भाव रोखण्याकरीता सर्वत्र लॉकडाउन सुरु आहे, यामुळे गोरगरीब मजूर , हातावर पोट भरणाऱ्यां नागरिकांचे हाल अत्यंतदयनीय आहे. अश्या परिस्थितीत ग्रामीण भागात आदिवासी बांधव यांचे अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे . याकरीता त्यांच्या मदतीकरीता येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेने धाव घेतली असून एक हात मदतीचा देवून संस्थेतर्फे लॉक डाऊन काळात तालुक्यातील मांडवेदिगर येथील गोरगरीब गरजुंना जीवनावश्यक वस्तु (धान्य ) वाटप करण्यात आले.
सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्था भुसावळ तर्फे जीवनावश्यक वस्तु यात पीठ तांदूळ,साखर,तेल,डाळ आदीं वस्तुंचे सुमारे 70 कुटुंबांना आज बुधवार २० में रोजी तालुक्यातिल मांडवेदिगर आदिवासी पाडा येथे वाटप करण्यात आले . येथील किमान शेकडो कुटुंबाना संस्थेतर्फे मदत करण्यात आली . या मदतकार्यात गेंदाबाई मोहनलाल लोढा ,मोहन भुवन प्रतिष्ठान जामनेर अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांनी किट उपलब्धते करीता विशेष सहकार्य लाभले संस्था अध्यक्षा राजश्री नेवे ,तसेच अध्यक्ष विनोद कुमार लोढा यांचे मार्गदर्शनाखाली
किराणा शिधा वाटप करण्यात आले.यावेळी शासनाच्या नियमांचे सोशल डिस्टनसिंग,मास्क, सॕनिटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.
जीवनावश्यक वस्तु वाटपाकरीता संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे, माया चौधरी, मंदाकिनी केदारे, स्मिता माहुरकर,संगिता लुल्ला तसेच उमेश नेवे, शिवाजी पाटिल, दिपक महाजन,सारंग केदारे,गोरलाल जाधव यांचेसह संस्थेच्या सदस्यांचे सहकार्य लाभले .



