भुसावळ (प्रतिनिधी)-
घरासमोर लावलेली बल्ली का काढली या कारणावरून वाद घालत चौघा आरोपींनी पाटीवर, पोटावर व डोक्यावर मारहाण करून पार्श्वभागावर चाकू मारल्याची घटना मंगळवारी रात्री 7.30 वाजता शहरातील कडू प्लॉट भागात घडली.
या प्रकरणी चौघांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे तर अन्य तीन संशयीत आरोपी पसार झाले आहेत. कन्हैय्या हरणे असे जखमीचे तर हरी महाजन असे अटकेतील आरोपीचे नाव असून अन्य तिघे पसार झाले आहेत.



