साध्या पद्धतीने विवाह ; खर्च टाळून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजारांची मदत ;

जळगाव (प्रतिनिधी )-
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अत्यंत साध्या पद्धत्तीने विवाह संपन्न करून जळगाव येथील सोनवणे आणि सपकाळे परीवाराने साध्या पद्धतीने विवाह करून याविवाहातून समाजापुढे आदर्श घालून दिला. पंकज व राजश्री यांचा नुकताच साई नगर खेडी खुर्द येथे आदर्श विवाह पार पडला. लग्नातील धुमधाम व बडेजाव टाळत मुलाचे वडिल सुरेश सखाराम सोनवणे (पिंप्राळा) व मुलीचे वडील देविदास श्रावण सपकाळे (जळगाव) यांच्या कडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजारांची मदत करण्यात आली. रकमेचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. आपत्ती काळात देखील आदर्श विवाह आणि सामाजिक उपक्रम घडवून आणल्याने या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *