भुसावळ (प्रतिनिधी )-
सध्या लॉक डाऊन सुरू असून शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यासक्रम व निकालाच्या कामात गुंतलेले आहेत परंतु शिक्षकांसाठी या सुट्टीचा उपयोग करून घेण्यासाठी गणित व विज्ञान विषयाची कार्यशाळा आयोजित करणार आहे
जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाची बैठक झुम ॲप द्वारे संपन्न झाली यावेळी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष किशोर राजे उपाध्यक्ष बी बी जोगी सचिव सुनील वानखेडे बोदवड तालुका समन्वयक वनिता अग्रवाल धरणगाव तालुका समन्वयक बी आर महाजन आदींनी या बैठकीत सहभाग घेतला यावेळी लॉक डाऊन चा उपयोग करून राजकोट येथील ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लबचे अध्यक्ष चंद्रमौली जोशी हे शिक्षकांशी ऑनलाईन संवाद साधून दोन दिवसाची कार्य शाळा घेणार आहेत या कार्यशाळेमध्ये गणिताच्या विविध क्रिया सूत्र सोप्या पद्धतीने शिकवणे गणिती सूत्र प्रयोगातून मांडणी करणे यासह इतर गणितातील सोपे ट्रिक्स शिक्षकांना देणार आहेत यानंतर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची देखील कार्यशाळा त्यांच्या माध्यमातून घेतली जाणार आहे यासाठी जिल्हाभरातील शंभर शिक्षकांची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे विज्ञान प्रसार नवी दिल्ली यांच्यावतीने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञानावरील विविध ऍक्टिव्हिटी करण्यात येणार आहे यासाठी तालुका समन्वयक यांच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करून ऑनलाइन ऍक्टिव्हिटी राबवण्यात येणार आहे यातील बेस्ट ऍक्टिव्हिटी ला प्रमाणपत्र व बक्षीस देऊन जळगाव जिल्हा अध्यापक मंडळाच्या वतीने गौरव करण्याचे ठरले
पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांन शोधनिबंध तयार करण्याबाबत व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप व झूम ॲपच्या माध्यमातून माहिती देणार आहे तसेच आपल्या परिसरातील समस्या व त्यावरील निराकारण विद्यार्थी शोध शोध घेऊन निष्कर्ष व अनुमान शोध निबंधातून मानतील उत्कृष्ट शोधनिबंधाचे सादरीकरण राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत करण्यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेचे जिल्हा समन्वयक सुनील वानखेडे यांनी सांगितले.
जिल्हास्तरीय कार्यशाळेसाठी आयोजन व शिक्षकांच्या निवडीचे काम तसेच ऑनलाइन कार्यशाळेसाठी तांत्रिक बाजू बघण्याचे काम विज्ञान अध्यापक मंडळाचे रावेर तालुका समन्वयक एस डी पाटील करणार आहेत.
सुट्ट्यांचा उपयोग गणित व विज्ञानाच्या ऍक्टिव्हिटी शिकण्यासाठी
सध्या शाळा बंद असून लॉक डाऊन असल्याने शिक्षक विद्यार्थी घरीच बसून आहे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बघता लॉक डाऊन लवकर उठणे शक्य नाही परंतु विद्यार्थ्यांचा या सुट्ट्यांमध्ये सकारात्मक उपयोग करून घेण्यासाठी त्यांचे व शिक्षकांचे ऑनलाईन प्रशिक्षण विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणार आहे.
किशोर राजे अध्यक्ष जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ जळगाव



